Iran Fuel Crisis : पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता सामान्य नागरिकांच्या जीवनापर्यंत पोहोचली आहे. इराणची राजधानी तेहरानमधील महत्त्वाच्या तेल साठवणूक केंद्रांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर प्रशासनाने इंधनाचा वापर नियंत्रित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तेहरान प्रांताच्या गव्हर्नरने नागरिकांसाठीच्या दैनंदिन पेट्रोल कोट्यात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.
३० लिटरऐवजी आता मिळणार फक्त २० लिटर पेट्रोल'फार्स न्यूज एजन्सी'ने दिलेल्या वृत्तानुसार, वैयक्तिक इंधन कार्डद्वारे मिळणारा पेट्रोलचा कोटा आता दररोज ३० लिटरवरून घटावून २० लिटर करण्यात आला आहे. तेल साठ्यांवर झालेल्या हल्ल्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, उपलब्ध साठा संतुलित राखण्यासाठी प्रशासनाला हे पाऊल उचलावे लागले आहे.
'घाबरू नका, ही तात्पुरती व्यवस्था'; प्रशासनाचे आवाहनतेहरानच्या गव्हर्नरने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. इंधन पुरवठ्यात आलेला हा अडथळा लवकरच दूर केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "ही व्यवस्था तात्पुरती असून परिस्थिती सामान्य होताच इंधन कोटा पुन्हा जुन्या स्तरावर (३० लिटर) आणला जाईल," असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- ऊर्जा केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या अंतर्गत इंधन पुरवठ्यावर प्रचंड ताण आला आहे.
- दोन-तीन दिवसांचा अवधी: परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता आहे.
- युद्धाच्या परिस्थितीत तेल सुविधेवर झालेले हल्ले इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
Web Summary : Following attacks on Iranian fuel infrastructure, Tehran is rationing petrol. Daily allowance reduced from 30 to 20 liters. The government assures a temporary fix, urging citizens not to panic as normalcy is expected soon.
Web Summary : ईरानी ईंधन ढांचे पर हमलों के बाद, तेहरान में पेट्रोल की राशनिंग की जा रही है। दैनिक भत्ता 30 से घटाकर 20 लीटर किया गया। सरकार का आश्वासन, नागरिकों से न घबराने का आग्रह, जल्द ही सामान्य स्थिति की उम्मीद है।